कार्तिक आर्यनने चिनी मोबाईल ब्रँडशी ‘कनेक्शन’ तोडले?

432

‘लुकाछुपी’ आणि ‘लव्ह आज कल’ सिनेमांत झळकलेल्या अभिनेता कार्तिक आर्यन याने चीनी मोबाईल ब्रँड ’ओपो’शी केलेला करार तोडल्याची चर्चा आहे. बुधवारी कार्तिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबाबतचे संकेत दिले. कार्तिकने आयफोन हातात घेऊन गॅलरीत उभं राहून ढगांना मोबाईल कॅमेऱयात टिपतानाचा फोटो अपलोड केला आहे. हा फोटो बघून कार्तिकने चीनच्या मोबाईल कंपनीची जाहिरात करणे सोडून दिलंय, असा अर्थ नेटिजन्स काढत आहेत. कारण एका ब्रँडशी करारबद्ध असताना दुसऱया ब्रँडची सोशल मीडियाकर कुणी जाहिरात करणार नाही.

ट्रेड तज्ञांच्या मते, कार्तिक ओपो कंपनीतून बाहेर पडलाय. हिंदुस्थान आणि चीन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असं पाऊल उचलणारा कार्तिक हा पहिला कलाकार ठरला आहे. गलवान खोऱयात चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात 20 हिंदुस्थानी जवान शहिद झाल्यानंतर कॉन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर संघटनेने चीनी उत्पादनांच्या जाहिराती करू नका, असे आवाहन सेलिब्रेटींना केलेले आ

आपली प्रतिक्रिया द्या