कसाऱ्याकडे जाणारा लोकलचा डबा घसरला, रेल्वे वाहतूक ठप्प

आज सकाळी साडेसातच्या सुमारास लोकलचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्याने आटगाव ते कसारा दरम्यानची लोकल वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या व कसाराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.

आज सकाळी 7 वाजून 28 मिनिटाच्या सुमारास मध्य रेल्वेच्या आटगाव स्टेशन जवळ लोकलचा 4 था डबा रुळावरून घसरला. ही लोकल कसारा कडे येत होती. लोकलचा डबा रेल्वे रुळावर घसरल्याने आटगाव ते कसारा वाहतूक ठप्प झाली . या लोकलच्या डब्यात 10 ते 12 प्रवासी होते. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचा मध्य रेल्वेने दावा केला आहे. या अपघाताची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन लोकलचा डबा रेल्वे रुळावरून दूर करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.

दरम्यान, करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास बंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांनाच रेल्वेतून प्रवासास मुभा देण्यात आली आहे. अत्यंत कमी प्रमाणात लोकांना प्रवासाची मुभा देण्यात आल्याने लोकलच्या फेऱ्याही मर्यादित प्रमाणात चालवण्यात येत आहेत.परिणामी जर नियमित प्रमाणे लोकल सेवा सुरु असती व नियमित प्रमाणे गर्दी असती तर मोठा अनर्थ झाला असता. लोकल चा डब्बा रुळावरून कशामुळे घसरला याबाबत चा खुलासा अदयाप मद्यरेल्वे कडून करण्यात आला नसून. दुर्घटना ग्रस्त लोकल चा डब्बा रेल्वे ट्रॅक वर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या