कसाऱ्याजवळ तीन वाहने एकमेकांवर आदळली, दशक्रियेवरून परतताना अपघात; २७ जण जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसाऱ्याजवळ ओहळाची वाडी येथे आज भीषण अपघात घडला. दशक्रियावरून परतताना चालकाला अंदाज न आल्याने भरधाव पिकअप ट्रकवर जाऊन धडकली. याचदरम्यान मागून आलेली कारदेखील पिकअपवर जोरदार अदळली. या विचित्र अपघातात २७ जण जखमी झाले असून यातील सात प्रवासी गंभीर असल्याने त्यांना एसएमबीटी रुग्णाल यात हालवण्यात आले आहे .

टाकेद येथील ग्रामस्थ डोळखांब येथून आज संध्याकाळच्या सुमारास दशक्रिया विधी उरकून पिकअप गाडीने घरी निघाले होते. कसाऱ्याजवळील ओहळाची वाडीजवळ पिकअप (एम.एच. १५ जे.डब्लू. १६५४) च्या चालकाला नाशिक दिशेने जाणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने पिकअप या ट्रकवर जाऊन धडकला. त्याचदरम्यान मागून आलेली कारही पिकअपवर अदळली. या विचित्र अपघातात पिकअप गाडीतील २७ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य भास्कर सदगीर, दत्ता वाताडे, शाम धुमाळ, अक्षय लाडके, सतीश खरे, सुनील करवर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर गंभीर जखमी असलेल्या चार महिल 5 ांसह सातजणांना एसएम बीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान एअर बॅग उघडल्याने कारमधील प्रवासी बचावले आहेत.