तुर्कीचा पाकिस्तानच्या मदतीने कश्मीरात जिहादी कारवायांचा कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुस्लिम जगताचे खलिफा बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तुर्कीने पाकिस्तानच्या मदतीने जम्मू-कश्मीरात मोठा जिहादी घातपात घडवण्याचा कट रचल्याचा इशारा ग्रीसच्या प्रसारमाध्यमांनी हिंदुस्थानला दिला आहे. ग्रीसमधील पेंटापोस्टाग्मा नावाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, तुर्की पाकिस्तानच्या मदतीसाठी लष्करी संघटनेच्या जवानांची म्हणजेच सादातची एक तुकडी कश्मीरमध्ये पाठवण्याच्या तयारीत आहे. तुर्की आशियामध्ये स्वतःला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आता तुर्कीने पाकिस्तानच्या मदतीने कश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा विचार सुरू केलाय. या अहवालामध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगन यांनी या मोहिमेची जबाबदारी सादात या लष्करी तुकडीकडे दिल्याचा उल्लेख आहे. सादातचे नेतृत्व एर्दोगन यांच्याकडे असले तरी त्यांचा प्रमुख सल्लागार अदनाना तनरिवर्दी हे सर्व काम पाहतो. तनरिवर्दी याने कश्मीरमध्ये सादातचा तळ निर्माण करण्यासाठी कश्मीरमध्ये जन्मलेल्या सय्यद गुलाम नबी फई नावाच्या दहशतवाद्याची नियुक्ती केली आहे, असेही ग्रीक मीडियाच्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.