
ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘देशोन्नती’चे संपादक प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व साधना जाधव, सदामंगल प्रकाशनच्या प्रकाशक-संपादक प्रज्ञा जांभेकर उपस्थित होते.
माईणकर यांनी राजकीय क्षेत्रातील अनेक विषयांवर लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखांबाबत मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मिडीयावरील कॉर्पोरेट पंट्रोल कमी झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आज अंबानी, अडाणी, सुभाषचंद्र यांच्याकडे किती चॅनेल्स आहेत याचा अभ्यास केला तर त्यांचा मोठा आवाका लक्षात येतो. मीडियावरील हा कॉर्पोरेट कंट्रोल कमी झाला पाहिजे, त्यावर मर्यादा आल्या पाहिजे, असे ते म्हणाले. अन्य मान्यवरांनीही जयंत माईणकर यांच्या निर्भिड लेखणीची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे यांनी केले.

























































