
सामना ऑनलाईन । मुंबई
दहशतवाद्यांशी लढा देताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात करण्यात आले. अत्यंत भावपूर्ण वातावरण, साश्रू नयनानांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
याआधी अंत्यदर्शन घेण्यासाठी मीरा रोड, भाईंदर येथील हजारों नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अंत्ययात्रेवेळी लष्करी ट्रक वर फुलांनी सजविलेली शवपेटी ठेवण्यात आली. नागरिकांच्या “कौस्तुभ राणे अमर रहे”च्या उत्स्फूर्त घोषणांनी सारा परिसर भरून गेला होता. देशासाठी शहीद झालेल्या कौस्तुभ राणे यांना आदरांजली वाहणारे होर्डिंग्ज आज संपूर्ण शहरात जागोजागी लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, वरिष्ठ लष्करी अधिकारी, यांनी देखील उपस्थित राहत श्रद्धांजली वाहिली.























































