
चारधाम यात्रेला जाणाऱया भाविकांची आता मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. केदारनाथमध्ये जवळपास 25 हजार भाविकांना पायवाटेपासून ते धामपर्यंत का@टेज आणि तंबूची व्यवस्था केली जात आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिलला उघडले जाणार आहेत. त्याआधीच प्रशासनाकडून मुक्कामाला राहणाऱया भाविकांसाठी का@टेज व तंबूंची व्यवस्था केली जात आहे.
भाविकांसाठी जंगलचट्टी, भीमबली, छोटी आणि मोठी लिनचोली यांसारख्या प्रमुख थांब्यांवर राहण्याची सोय सुनिश्चित केली जात आहे. धाम आणि पायवाट मिळून जवळपास 25 हजार भाविकांच्या राहण्याची व्यवस्था तयार करण्यात आली आहे. गडवाल मंडळ विकास निगमचे कायमस्वरूपी का@टेज जंगलचट्टी, भीमबली, छोटी लिनचोली आणि मोठी लिनचोली येथे उपलब्ध आहेत. यांमध्ये सहा ते सात हजार यात्रेकरूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पायवाटेवर आणि केदारनाथ धाममध्ये 1 हजार तंबू उभारले जात आहेत.
या तंबूंमध्ये 6 हजार यात्रेकरू रात्रीचा मुक्काम करू शकतील. रुद्रा पॉइंटपासून केदारनाथ धामपर्यंत स्थानिक तरुणांना 1200 तंबू लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. या तंबूंमध्ये 8 हजार भाविक राहू शकतील. केदारनाथ धाममध्ये आतापर्यंत राहण्याची व्यवस्था मर्यादित क्षमतेवर अवलंबून होती. मात्र आता 25 हजार भाविकांची व्यवस्था होणार आहे.


























































