केजच्या स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित तरुणाचा मंगळवारी मृत्यू

289

केज तालुक्यातील नांदूरघाट येथील 32 वर्षांच्या तरुणाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे केजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने सोमवारी दुपारी त्याचा स्वॅब घेण्यात आला.

रात्री उशीरा तो अत्यवस्थ झाल्याने त्याला 12.30 वाजता अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे अवघ्या तासाभरात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरूणाच्या स्वॅबचा रिपोर्ट मंगळवारी येण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या