केरळमधील पूरग्रस्तांना सागरी संघटनांचा मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

केरळमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध सागरी संघटनाही पुढे आल्या आहेत. मेरीटाइम असोसिएशन ऑफ शिपओनर्स मॅनेजर्स ऍण्ड एजंटस् (मास्सा), द मेरीटाइम युनियन ऑफ इंडिया आणि नॅशनल युनियन ऑफ सी फेरर्स ऑफ इंडिया तीन सागरी संघटनांनी प्रत्येकी 10 लाख असे मिळून 30 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री केरळ रिलीफ फंडला देण्यात येणार आहे. याशिवाय हॉँगकाँगच्या अँग्लो ईर्स्टन शिपिंग ग्रुपनेही 35 लाख रुपयांचा मदतनिधी जाहीर केला आहे.

सागरी उद्योग क्षेत्रात केरळचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असून त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे ‘मास्सा’चे अध्यक्ष प्रशांत रांगणेकर यांनी सांगितले. तर पुढच्या एक आठवडय़ाच्या आत मुख्यमंत्री केरळ रिलीफ फंडला 35 लाख रुपयांचा धनादेश पोहोचलेला असेल असे अँग्लो ईस्टर्न शिपिंग ग्रुपचे हिंदुस्थानातील प्रमुख विजय सिंग यांनी सांगितले. दरम्यान, मर्चंट नेव्हीतील अनेक कर्मचारी हे केरळच्या पूरग्रस्त भागाचे रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे आमचे कर्तव्यच असल्याचे मेरीटाइम युनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अमर सिंग ठाकूर म्हणाले. तर नॅशनल युनियन ऑफ सी फेरर्स ऑफ  इंडियाचे कोचीतील कार्यालय शोधकार्य आणि पुनर्वसनाच्या कार्यात स्थानिक प्रशासनाला 24 तास सहकार्य करत असल्याचे सरचिटणीस अब्दुल गनी सेरंग यांनी सांगितले.

बाळगोपाळ गणेशोत्सव मंडळ देणार सराव शिबिराचा निधी

अभ्युदयनगरच्या बाळगोपाळ सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा दहीहंडी सराव शिबीर रद्द केले असून त्याचा निधी केरळच्या पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हे मंडळ दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळाने यंदा शिबीर रद्द केल्याची माहिती उपशाखाप्रमुख आणि बालगोपाळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष आमडोस्कर यांनी दिली.

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे 21 कोटींची

केरळ  पूरग्रस्तांसाठी देश आणि जगभरातून आर्थिक तसेच अन्नधान्यांच्या स्वरूपात मदत दिली जात असताना रिलायन्स फाऊंडेशन या मुंबईतील सामाजिक संस्थेने केरळ मुख्यमंत्री मदतनिधीला 21 कोटींची मदत जाहीर केली आहे. फाऊंडेशनने या आधीही देशात आलेल्या पूर, भूकंपासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तीत सढळ हस्ते राज्यांना मदत केली आहे. अशी मदत करणे ही आमचे कर्तव्य असल्याची भावना फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी व्यक्