पुरुषाच्या सहमतीशिवाय स्पर्म घेऊन त्याचे क्रायोप्रिझर्वेशन करण्यास केरळ हायकोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे Asisted Reproductive Technology (ART) या तंत्रज्ञानाच्या मदतीने आई होण्यास इच्छुक असणाऱ्या एका महिलेला दिलासा मिळाला आहे.
गंभीर आजारी पतीचे स्पर्म घेण्यासाठी पत्नीने केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली होती. महिलेच्या याचिकेवर हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. “स्पर्म देण्यास पुरुषाच्या सहमतीची गरज नाही, कारण संबंधित पुरुष हा सहमती देण्याच्या स्थितीमध्ये नाही. तसेच त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे”, असे न्यायामूर्ती व्हीजी अरूण यांनी 16 ऑगस्टला जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे याचिकाकर्त्या महिलेला उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
स्पर्म काढणे आणि जतन करणे या व्यतिरिक्त अन्य कोणतीही प्रक्रीया करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच त्या प्रक्रियेसाठी हायकोर्टाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ART रेग्युलेशन अॅक्ट नुसार कोणत्याही पुरुषाचे स्पर्म काढण्यासाठी त्याची लेखी संमती घेणे गरजेचे असते.