फोटो काढायला गेला अन मृतदेह बोलू लागला, वाचा कुठे हा धक्कादायक प्रकार घडला

2431

केरळमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एर्णाकुलम येथे मृतदेहाचा फोटो काढायला गेलेल्या फोटोग्राफरमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. पोलिसांच्या कागदी कारवाईसाठी फोटो काढण्यासाठी गेलेल्या फोटोग्राफरला अचानक आवाज ऐकू आला. फोटोग्राफरने मृतदेहाच्या जवळ जाऊन पाहिले असता तो जिवंत असल्याचे आढळून आले. शिवदासन असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मूळचा पलक्कड येथील रहिवासी असलेला शिवदासन कलानमसेरी जवळील मनालीमुक्कू येथे Bभाड्याच्या घरात राहतो. रविवारी त्याच्या जवळ राहणाऱ्या एक व्यक्तीने पोलिसांना शिवदासन याचा मृत्यू झाल्याचे कळवले. पोलिसांनी टॉमी नावाच्या फोटोग्राफरला मृतदेहाचे फोटो घेण्यासाठी बोलावले. टॉमी मृतदेहाचे फोटो घेत असताना त्याला आवाज ऐकू आला. हा आवाज मृतदेहाकडून येत असल्याचे त्याला आढळले.

काय आहे प्रकरण?
टॉमी नावाचा हा फोटोग्राफर गेल्या 25 वर्षांपासून पोलिसांसोबत अशा प्रकरणात काम करत आहे. याबाबत माहिती देताना फोटोग्राफरने सांगितले की, जेव्हा आम्ही शिवदासन याच्या घरी गेलो तेव्हा तो फरशीवर पडलेला होता. पलंगाच्या टोकदार भागाला टक्कर बसल्याने त्याच्या डोक्यावर दुखापत झाली होती. रूममध्ये लाईट कमी असल्याने बटन ऑन करून फोटो काढू लागलो तेव्हा हलकासा आवाज ऐकू आला.

अन मृतदेह बोलू लागला
सुरुवातीला टॉमीने याकडे लक्ष दिले नाही. मात्र अचानक त्याने मृतदेहाच्या जवळ जाऊन पाहिले असता तो काहीतरी बोलत असल्याचे आढळले. यानंतर टॉमी याने पोलिसांना माहिती दिली आणि तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. येथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असून फोटोग्राफरच्या समयसूचकतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या