केरळमध्ये भीषण दुर्घटना, भूस्खलनामुळे 80 जण जमिनीत गाडले गेले; 12 मृतदेह हाती

1143

केरळमधील मुन्नार येथे अति मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पावसामुळे जमीन खचून झालेल्या भूस्खलनात चहाच्या बागेत काम करणारे 80 कर्मचारी मातीखाली दबले आहे. या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत 12 मृतदेह हाती लागले आहेत, तर 10 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व कर्मचारी टाटा ग्लोबल बेवरेजेजची (टीजीबी) सहकारी कंपनी कन्नन देवान हिल्स प्लांटेशन कंपनी प्राइवेट लिमिटेड (केडीएचपी) साठी काम करतात.

‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, राजमलाई येथील नेम्मक्कड इस्टेटच्या पेटीमुडी डिव्हिजनमध्ये 20 कुटुंब राहतात. हे सर्व चहाच्या बागेत काम करतात. हे कुटुंब राहत असणाऱ्या घरावर एक डोंगर कोसळला. याखाली 80 लोक दबले असून एनडीआरएफसह केरळ सरकारचे बचावपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आतापर्यंत 12 मृतदेह हाती लागले असून 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. इतरांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी बचवकार्यासाठी वायूदलाकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. आतापर्यंत 50 जणांचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या भागात तुफान पाऊस सुरू असून लाईटही नाही, त्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या