संजूबाबामुळे ‘केजीएफ 2’ चे शूटिंग लांबणीवर

668

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान नुकतेच झाले आहे. लवकरच तो उपचारासाठी परदेशात जाणार आहे. प्रकृतीच्या कारणास्तव संजूबाबाने कामातून ब्रेक घेतल्याने त्याच्या आगामी केजीएफ 2 चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडणार आहे. केजीएफ 2 मध्ये संजूबाबा अधिरा नावाच्या खतरनाक व्हिलनची भूमिका साकारणार असून नुकतेच त्याचे पहिले पोस्टर लॉंच झाले होते. याबाबत निर्माते कार्तिक गौडा म्हणाले, ’संजय दत्त उपचार करून परतल्यानंतर केजीएफ 2 चे राहिलेले शूटिंग पूर्ण करणार आहे. या चित्रपटाचे तीन दिवसाचे शूटिंग बाकी आहे. नुकतेच माझे याबाबत त्याच्याशी बोलणे झाले आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या