
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पहाटे शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. खालापूर टोलनाक्याजवळील धामणी गावाच्या हद्दीत पुणे लेनवर हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने बोईसरवरून कोल्हापूरला निघालेली बस रस्त्याच्या बाजूला घसरली. बसच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला असून चालक, वाहकासह 13 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बोईसरवरून कोल्हापूरला शिवशाही बस निघाली होती. पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान अचानक एका अज्ञात वाहनाने बसला धडक दिली. यामुळे वेगावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला घसरली. जोराच्या धडकेमुळे प्रवासी एकमेकांच्या अंगावर जाऊन आदळले. सीट, पत्रा, काचा तुटल्या. बसमधून 27 प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी 13 प्रवासी जखमी झाले. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. खालापूर पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा पळस्पे, आय. आर. बी. पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य रुग्णालयाची अॅम्बुलन्स, स्वामिनी अॅम्बुलन्स सर्व्हिस या यंत्रणांनी या अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना तत्काळ कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमींची नावे
विभुती तर्क, राजश्री पाटील, अनवी भोसले, अविनाश मोरे, वैशाली भोसले, नंदा साबळे, नम्रता साबळे, सुदेश भोसले, दर्शना मोरे, सुभेद भालेराव, मंगला देसाई, चंद्रकांत झोवाड, सतीश दिघोड,