महायुद्ध पेटणार; इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात खामेनींच्या कुटुंबाचा खात्मा; मुलगी, जावई आणि नातीचा मृत्यू, बदला घेण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामने यांच्यासह त्यांचे कुटुंब इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात ठार झाले आहे. इराणी सरकारी मीडिया आणि ‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातीचा मृत्यू झाला आहे. इराणी माध्यमांनीही खामेनी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून इस्रायल-अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू, जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची मुलगी, जावई आणि नात यांचा अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी रविवारी दिले. ‘फार्स न्यूज एजन्सी’ आणि इतर इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवासस्थानातील विश्वसनीय सूत्रांशी संपर्क साधल्यानंतर खामेनी यांची मुलगी, जावई आणि नात यांच्या मृत्यूच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. या भीषण हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आता शिगेला पोहोचला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मिडिया माध्यमावर पोस्ट करत अयातुल्ला अली खामेनी यांना ठार केल्याची माहिती दिली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही यास दुजोरा देत खामेनी यांचा मृतदेह सापडल्याचे म्हटले होते. अमेरिका-इस्रायलने खामेनी यांच्या कार्यालयावर क्षेपणास्त्र डागली होती. हल्ला झाला तेव्हा खामेने कुटुंबासह कार्यालयात उपस्थित होते. तसेच त्यांच्या घराजवळही बंकर बस्टिंग क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. या हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तसेच खामेनी यांचा सल्लागार अली शामखानी याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.

Iran-Israel war – इराणचा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला, चार कर्मचारी जखमी

बदला घेण्याचा इशारा

इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने खामेने यांच्या मृत्यूस अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. खामेनींचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे म्हणत या संघटनेने बदला घेण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, इराणने इस्रायलची आर्थिक राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. इराणने 70 हून अधिक क्षेपणास्त्र डागत शहरात हाहाकार उडवून दिला.