तुळजापूर शिवसेना उपतालुका प्रमुखांची खंडाळा ते तुळजापूर दंडवत यात्रा

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास तुळजाभवानी चरणी पायी दंडवत घालत येईन, असा संकल्प तुळजापूर शिवसेना उपतालुका प्रमुख विष्णु शिंदे यांनी केला होता. केलेल्या संकल्पाप्रमाणे विष्णु शिंदे यांनी रविवारी दंडवत यात्रेला सुरुवात केली. खंडाळा ते तुळजापूरपर्यंत ते दंडवत यात्रआ करत आहेत. या वेळी लातूर शिवसेना तालुका संघटक बाबुराव शेळके, शिवसेना लातूर तालुका सचिव महादेव काळे, उपतालुका प्रमुख विजय झाडके, भानुदास मचावे आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या