खानोलकर स्मृती एसपीजी टेनिस स्पर्धा 14 मार्चला

शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे (एसपीजी) टेनिसपटू व संघटक दादा खानोलकर स्मृती एसपीजी टेनिस स्पर्धा 14 मार्च रोजी दादर-पश्चिम येथील एसपीजी टेनिस कोर्टवर आयोजित करण्यात आली आहे.‘सिक्युरीटी एचक्यू’ ही जागतिक सायबर सिक्युरीटी कंपनी या स्पर्धेची मुख्य प्रायोजक आहे. ही टेनिस स्पर्धा  सलग पाचव्या वर्षी दुहेरी गटात खेळविली जाणार असून टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक यांच्यासाठी ही स्पर्धा मर्यादित आहे.

टेनिसमधील मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक हे महत्त्वाचे दोन घटक स्पर्धेपासून वंचित होत असल्यामुळे शिवाजी पार्क जिमखान्याने स्पर्धेचे सातत्य राखले आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी ट्रॉफी व  एकूण रु.41,000/- रकमेचे पुरस्कार आहेत. अंतिम विजेत्यास दादा खानोलकर स्मृतिचषक व रुपये बारा हजाराचे बक्षीस व उपविजेत्यास दादा खानोलकर स्मृतिचषक व रुपये दहा हजारचे बक्षीस दिले जाणार आहे. इतरही स्पर्धकांना योग्य बक्षिसे दिली जातील. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन मान्यताप्राप्त आहे. टेनिस रसिकांनी या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद देतानाच विशेषतः युवा वर्गाने टेनिस मार्कर अथवा सहाय्यक प्रशिक्षकाच्या सेवेस करीअर म्हणून पाहावे हादेखील या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित खेळाडूंनी प्रवेशासाठी अथवा अधिक माहितीसाठी संजय पटेल 98202 41351, शिवाजी पार्क जिमखाना, दादर-पश्चिम, मुंबई-400028 यांच्याकडे 11 मार्चपर्यंत दररोज सकाळी 10 ते सायं. 5 च्या दरम्यान संपर्क साधावा.

आपली प्रतिक्रिया द्या