खारघर – नाल्याची पातळी वाढल्याने फिरायला गेलेले 116 जण अडकले, सुखरूप सुटका

खारघर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ह्यांनी फलक, सोशल मिडीयाद्वारे व बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वेळोवेळी सांगून देखील काही नागरिक विशेष करून महिला या पोलिसाची नजर चुकवून आडमार्गाने खारघर डोंगरात जातात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतात.

रविवारी सायंकाळी गोल्फ कोर्सच्या मागील नाल्यात पावसाने अचानक वाढ झाल्याने डोंगरात फिरायला गेलेले 116 जण अडकले. अडकलेल्यांपैकी 78 महिला 5 मुलं हे पलिकडे अडकल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्यात मिळाली. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या जवानांच्या साहाय्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

अडकलेल्या सर्वानी फायर ब्रिगेड खारघर व नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले. तरी नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी केले असून कोणी डोंगरात आढळून आल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती माळी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या