दाऊद इब्राहिमच्या मुंबके येथील घरात आता विद्यार्थी गिरवणार सनातन संस्कृतीचे धडे

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्ब्राहीम याच्या खेड तालुक्यातील मुंबके येथील घरामध्ये सनातन स्कूल सुरु करण्याचा निर्णय दाऊदची मालमत्ता लिलावात खरेदी करणारे ऍड श्रीवास्तव यांनी घेतला आहे. श्रीवास्तव यांच्या या निर्णयामुळे ज्या घराच्या भिंतींना या आधी अंडरवर्ल्डच्या घडामोडी ऐकण्याची सवय होती त्या भिंतींना आता सनातन संस्कृतीचे धडे अनुभवता येणार आहेत.

अवघ्या जगावर राज्य करणारा कुख्यात अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या मुंबके या गावचा आहे. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे महारष्ट्र पोलीस दलात कार्यरत होते. उपलब्ध माहितीनुसार 1979-80 च्या दरम्यान त्यांनी मुंबके येथे घर बांधले होते. दाऊदचे कुटुंब जेव्हा सुट्टीसाठी गावी येत असत तेव्हा या घरामध्ये त्यांचे वास्तव्य असे. तळमजला आणि त्यावर दोन माळे असलेल्या या घरात सद्यस्थिती कोणीही राहत नसल्याने दाऊदचे हे घर भूतबंगला झाले होते.

केंद्र सरकारच्या स्मगलर फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स ऍक्ट (साफेमा) ऑथॉरिटीस ने दाऊद इब्राहिम याची मालमत्ता जप्त करून त्या मालमतेचा लीलाव केला होता. दिल्ल्ली येथील ऍड अजय श्रीवास्तव यांनी दाऊदची ही मालमत्ता लिलावात खरेदी केली होती

गेले काही महिने पडून असलेली मालमता आता उपयोगात आणण्याचा निर्णय ऍड अजय शिवस्तव यांनी घेतला आहे. ज्या घरामध्ये कधीकाळी दाऊद इब्राहिमचा कुटुंब वास्तव करता होते त्या घ्रराला आता चित्रगुप्त भवन असे नाव देण्यात आले असून या घरामध्ये येत्या काही दिवसात सनातन धर्म पाठशाळा ट्रस्टचे गुरुकुल सुरु केले जाणार आहे. ऍड अजय श्रीवास्तव यांच्या या निर्णयामुळे खेड तालुक्यात शिक्षणाचे आणखी एक दालन खुले होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या