भरणे जाधववाडी जवळ टेम्पो-ट्रकची धडक, एक जण गंभीर जखमी

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडी येथे भरधाव टेम्पो आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात चालक उमाशंकर रामसुस्त भिल्ला हा गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. भिल्ला याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

ओंकार विलास चरकरी आपल्या ताब्यातील मालवाहतूक ट्रक घेऊन मुंबईहून रत्नागिरीला जायला निघाले होते. त्यांचा ट्रक भरणे जाधववाडी येथे आला असता समोरून येणाऱ्या टेम्पोवरील चालक उमाशंकर रामसुस्त भिल्ला याचा टेंपोवरील ताबा सुटला आणि तो टेम्पो समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन जोरात आदळला.

या अपघातात टेम्पो चालक भिल्ला याच्या हाताला, डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. जखमी भिल्ला याला कळंबणीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची खबर मिळताच खेड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालक भिल्ला याला नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

आपली प्रतिक्रिया द्या