नातुनगर-घागवाडी मार्गावर दरड कोसळली, रस्ता नादुरुस्त झाल्याने दोन वाड्यांचा संपर्क तुटला

332

शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नातूनगर-घागवाडी-कोंडिवाडी रस्त्यावर दरड कोसळल्याने या दोन वाड्यांचा तालुक्याशी असलेल्या संपर्क तुटला. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगज्जीपणामुळे रस्त्यावर खर्च केलेला कोट्यावधी रुपयांच निधी पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील नातूनगर येथून घागवाडी आणि कोंडिवाडी येथे जाणाऱ्या पाच ते सहा किलोमिटर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून करण्यात आले होते. या कामासाठी शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्ता तयार करताना दरड कोसळून रस्ता बद होणार नाही. याची खबरदारी न घेतल्याने या रस्त्यावर केलेला कोट्यावधी रुपयांचा निधी वाया गेला आहे.

गेले चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे शनिवारी मध्यरात्री नव्याने केलेल्या रस्त्यावर दरड कोसळली आणि रस्ता वाहन गेला. रस्ता वाहून गेल्याने या दोन्ही वाड्यांमधील ग्रामस्थाची दळणवळणाच्या दृष्टीने फार मोठी गैरसोय झाली. आज सकाळी घागवाडी येथील एका आजारी व्यक्तिला रुग्णालयात आणायचे होते मात्र रस्त्याच वाहून गेल्याने त्या रुग्णाला रुग्णालयात आणण्यासाठी येथील ग्रामस्थांना फार कष्ट करावे लागल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. शनिवारी झालेल्या मुसधार पावसामुळे दरड कोसळून रस्ता वाहून गेला आहे हे जरी खरे असले तरी हा संबधित ठेकेदाराचा हलगर्जीपणा आहे. त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

आपली प्रतिक्रिया द्या