‘खेलो मोर’च्या माध्यमातून दहा हजार मुलांना हायटेक फुटबॉल प्रशिक्षण

348

मुंबईतील 4 ते16 वर्षे वयोगटातील दहा हजारांहून अधिक मुलांना स्थानिक पातळीवरील फुटबॉल सुधारणेसाठी आता सर्वोत्तम प्रशिक्षण मिळणार आहे. आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स आयोजित हा उपक्रम मुंबईकर बाल आणि युवा फुटबॉलपटूंसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. चर्चगेट ते ठाणे, जुहू ते पवई व लोअर परळ ते वाशीपर्यंत असलेल्या जवळपास 40 फुटबॉल केंद्रांमध्ये ही सुविधा मिळणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवा खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळेल व त्यामुळे भविष्यातील देशाचे स्टार फुटबॉलपटू बनण्यास या खेळाडूंना मदत होईल.

खेलो मोरची कल्पना असलेल्या फुटबॉलमेनिया अंतर्गत केंद्र व स्थानिक फुटबॉल क्लब यांच्यात प्रत्येक रविवारी सामना होतो. या सामन्याच्या माध्यमातून त्यांना आपले कौशल्य सुधारण्यास मदत मिळते. जवळपास 170 संघ आगामी काही महिन्यातसिक्स अ साइडसेव्हन अ साइडअशा दोन फॉरमॅटमध्ये सहभागी होतील. दोनशे मान्यताप्राप्त फुटबॉल प्रशिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी असतील. या कार्यक्रमाअंतर्गत सराव व स्पर्धांसाठीचे योग्य नियोजन केले जाईल. यामध्ये अनेक मुलींचादेखील समावेश असेलहिंदुस्थानी बॅडमिंटन संघाचे द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. पुलेला गोपीचंद यांनी मंगळवारी प्रशिक्षकांच्या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले.

आपल्याकडे फुटबॉलमध्ये खूप चांगले कौशल्यवान खेळाडू आहेत, पण स्थानिक पातळीवर सराव व संधी न मिळाल्याने ते पुढे येऊ शकले नाहीत. फुटबॉल मेनियाच्या माध्यमातून आम्ही हेच कौशल्य शोधण्यासाठी प्रणाली विकसित करणार आहोत.

जतीन परांजपे, ‘खेलो मोरचे संस्थापक व सीईओ

आपली प्रतिक्रिया द्या