किम जोंगला कोरोना व्हायरसच्या भितीने ग्रासले, चीनवरून परतलेल्या अधिकाऱ्याला घातली गोळी

4617
north-korean-official

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांची विचित्र वर्तणूक साऱ्यांनाच माहीत आहे. एक छोटीशी चूक आणि जीव गमवावा लागण्याची शक्याता इथे असते. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी, उपचार करण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. त्याचवेळी उत्तर कोरियामध्ये व्हायरसने संक्रमित पीडितांवर अत्याचार सुरू आहे.

रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसच्या केवळ संशयावरून उत्तर कोरियाचे एका अधिकाऱ्याला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र या अधिकाऱ्याने चुकीने सार्वजनिक बाथरूम वापरले, त्यामुळे त्याचा जीव घेण्यात आला.

दक्षिण कोरियातील वृत्तपत्र डोन्ग-ए-इलबो च्या माहितीनुसार, चीन मधून परतल्यावर त्या अधिकाऱ्यांला स्वतंत्र ठेवलेले होते. मात्र सार्वजनिक बाथरूम वापरल्यामुळे कोरोना व्हायरस पसरवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आणि गोळी घाऊन हत्या करपण्यात आली.

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांच्या अनुमतीशिवाय क्वॅरेंटाइन (संक्रमित लोकांसाठी उभारण्यात आलेली स्वतंत्र जागा) सोडून जाणाऱ्या विरोधात थेट सैनिकी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

यूके मिररच्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या एका अन्य अधिकाऱ्याला चीनमधून आल्याची माहिती लपवल्याबद्दल देशातून हकलण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या वृत्तानुसार उत्तर कोरियात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठी आहे. मात्र त्याची माहिती लपवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या