किराणा मालाच्या दुकानातून तांदूळ आणि तेल चोरीला

717
crime-spot

पत्राशेडचे पत्रे उचकटून चोरट्यांनी 120 कट्टे तांदूळ आणि तेलाचा बॉक्स असा एकूण एक लाख 13 हजार 992 रुपयांचे अन्न-धान्य चोरून नेले. ही घटना हिंजवडी जवळील माण येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली. संचारबंदीच्या काळातही चोऱ्या होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

श्रवणकुमार पुखराजजी गेहलोत (वय 43, रा. गुजरनगर, थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास फिर्यादी श्रवणकुमार यांनी आपले किराणा मालाचे दुकान बंद केले. 14 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले.

चोरट्यांनी दुकानाचे पत्रे उचकटून आतील 120 तांदळाचे कट्टे आणि गोडेतेलाचा बॉक्‍स असा एकूण एक लाख 13 हजार 992 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या