किसान रेल्वेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

मध्य रेल्वेने ऑगस्टपासून सुरू केलेल्या देवळाली-मुजफ्फरपूर किसान रेल्वेला आता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तर भुसावळला थांबा असणारी पोरबंदर-शालिमार पार्सल गाडीदेखील 1 एप्रिलपर्यंत धावणार आहे, अशी माहिती भुसावळ मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

भुसावळ रेल्वे मंडळातील नाशिक, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बऱहाणपूर, खंडवा या स्थानकांवर थांबे असणारी देशातील पहिली देवळाली-मुजफ्फरपूर ही किसान रेल्वे, तसेच तिला जोडली जाणारी सांगोला-मनमाड किसान लिंक पार्सल गाडी आता 31 मार्चपर्यंत चालविण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या