अचूक प्रमाण

65
  • एक वाटी कणिक मळल्यावर त्याच्याबरोबर तीन पोळ्या होऊ शकतात.
  • घरी पाहुणे आल्यावर एक डिश पोहे बनवायचे असतील तर एक वाटी पोहे घ्यायचे.
  • दोन डिश उपमा बनवायचा असल्यास एक वाटी रवा आणि एक वाटी गरम पाणी घ्यायचे.
  • पुलाव/जिरा राईस/मसाले भात करण्यासाठी एक वाटी तांदूळ आणि दोन वाटय़ा गरम पाणी घ्यायचे.
  • पाच पुरणपोळ्या बनवायच्या असतील तर एक वाटी हरभरा डाळ आणि पाऊण वाटी गूळ घ्यावा.
  • सुरळी वडीसाठी एक वाटी बेसन,दोन वाटय़ा ताक घ्यायचे.
  • तीन डिश खिचडी बनवण्यासाठी एक वाटी साबूदाणा आणि दीड वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा.
  • तेलाच्या किटलीतील तेल संपले असल्यास कणिक फिरवून घ्यावी. किटली तेलकट चिकट होत नाही. तेल वाया जात नाही.
आपली प्रतिक्रिया द्या