1 / 8
बुधवारी असिमानंद यांची समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी पंचकुलाच्या विशेष न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
नब कुमार सरकार हे स्वामी असिमानंद यांचे मुळ नाव असून पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला आहे.
सुरुवातीपासूनच असिमानंद यांना जतीन चटर्जी, ओंकारनाथ या टोपण नावाने ओळखले जायचे. त्यांनी आदिवासी-वनवासी क्षेत्रात सेवा केली आहे.
स्वामी असिमानंद यांचे नाव 2007 मध्ये हिंदुस्थानात झालेल्या तीन वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांशी जोडण्यात आले होते
18 मे 2007 रोजी हैदराबाद येथील मक्का मशीदीतील स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर ऑक्टोबर 2007 मध्ये अजमेर येथील चिस्ती दर्ग्यातील बॉम्बस्फोटात 3 जण ठार झाले होते.























































