आहारात लोणचे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आपला आहार हा चौरस असणे हे खूप गरजेचे आहे. फार पूर्वीपासून आपल्या आहारामध्ये लोणच्याचा समावेश आहे. लोणचे हे फक्त तोंडीलावणीसाठी नसून, त्याचे आरोग्यवर्धक फायदेही बरेच आहेत. म्हणून आहारामध्ये लोणच्याचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. लिंबू, गाजर, टोमॅटो, कांदा, लसूण, आवळा, फणस, आंबा, आवळा अशी अनेक लोणची पूर्वीपासून आपल्या घरांमध्ये घातली जात असत.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताटामध्ये एक वाटी हा पदार्थ आहारात असायलाच हवा, वाचा

लोणचे जरी कमी प्रमाणात खाल्ले तरी, ते आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आंबट, गोड आणि मसालेदार चवींमध्ये उपलब्ध असलेले लोणचे आपल्या जिभेची चव वाढवते. लोणचे हे प्रामुख्याने मसाले, मोहरीचे तेल, मीठ आणि व्हिनेगरपासून बनवले जातात. जेवणासोबत एखादी लोणच्याची फोड असली तरी त्याचे फायदे खूप पटीने जास्त होतात.

लोणचे खाण्याचे फायदे

गर्भधारणेदरम्यान लोणचं खाण्याची इच्छा अनेकींना होते. आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे खाल्ल्याने गर्भवती महिलांमध्ये अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी सुद्धा लोणचे हे फार महत्त्वाचे आहे. लोणच्यामध्ये खूप कॅलरीज असतात. लोणचे खाल्ल्याने चरबी लवकर जळण्यास मदत होते.

तांब्याच्या भांड्यात किती तास पाणी ठेवून प्यावे? जाणून घ्या

 

लोणचे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे आरोग्यासाठी याचे खूप फायदे होतात.

लोणचे मधुमेहींसाठी सुद्धा खूप फायदेशीर मानले जातात. मधुमेहींनी खासकरून आवळ्याचे लोणचे खाणे खूप फायदेशीर मानले जाते.

लोणचे हे व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत आहे. हे व्हिटॅमिन रक्त गोठण्यासाठी फार महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच पानात आजारी व्यक्तींनी थोडे तरी लोणचे हे घ्यायलाच हवे.

बडीशेप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून व्हाल थक्क

लोणचे खाल्ल्याने चयापचय सक्रिय होते, त्यामुळे त्यात असलेल्या फायबरमुळे पचन सुरळीत राहते.

हृदयरोगाने ग्रस्त असलेल्यांनी मात्र लोणचे खाणे टाळावे.