भाताचे उत्पादन वाढण्याकडे अधिक लक्ष द्यावे – कृषीमंत्री दादाजी भुसे

274
dadaji-bhuse

दररोजच्या  आहारात भाताला अनन्य साधारण एक महत्व आहे.अनेकांचा आहार हा भाताशिवाय पुरक होवू शकत नाही. त्यामुळे भात पिकांची मागणी ही सतत वाढणारी आहे. भात पिकांची वाढलेली मागणी पाहता ती पूर्ण करण्यासाठी शेजाऱ्यांनी आपले भाताचे उत्पादन आधुनिक पद्धतीने पध्दतीने वाढविले पाहिजे. त्यासाठी कृषी विदयापीठाच्या तंत्रज्ञानाचा उपायोग शेतकऱ्यांनी केला पाहीजे.  भात पिकाचे शेतकऱ्यांनी घेतलेले उत्पादन हे वाया जाणार नाही. भात पिकाखालील क्षेत्र आणि भताची उत्पादकता अजून कशी वाढली जाईल याकडे आपण प्रमामुख्याने लक्ष दिले पाहीजे. लाल आणि काळा भात या सारख्या भाताच्या जातींना प्रोत्साहन दिले पाहीजे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सुचनेप्रमाणे हे वर्ष उत्पादकता वाढ वर्ष म्हणून साजरे करण्याचे योजले आहे. अशाप्रकारे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पध्दतीने झूम मिटींग अॅपच्या माध्यमातून राज्यस्तरीय भात पीक परिसंवादात बोलताना मांडले.

आपली प्रतिक्रिया द्या