कोल्हापूरच्या 92 वर्षीय आजींनी कोरोनाला हरवले

कोल्हापूर येथील लीला वाघमोडे या 92 वर्षीय आजींनी सरकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाच्या बळावर अखेर कोरोनाला हरवले. मिरज येथील खासगी रुग्णालयात आठ दिवस उपचार घेऊन बऱया झाल्यानंतर आजी आपल्या घरी परतल्या आहेत.

कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या लीला वाघमोडे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आल्याने त्यांना तातडीने मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात आठ दिवस घेतलेल्या योग्य उपचारांमुळे कोरोनासारख्या गंभीर आजारावर यशस्वी मात करत त्या आपल्या घरी परतल्या आहेत. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यावर सुरुवातीला त्यांची प्रकृती बिघडत होती. मात्र डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार, परिचारिकांनी घेतलेली काळजी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी कोरोनाला हरवले.

आपली प्रतिक्रिया द्या