कोल्हापूरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, कोविड सेंटरची संख्या दुप्पट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, ही जिल्ह्यासाठी सकारात्मक बाब आहे. तरीही नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे इतर राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 42 लाख 45 हजार 215 इतक्या लोकसंख्येपैकी केवळ 1 लाख 124 कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी 81 हजार 643 रुग्ण बरे झाले असून, 25 मे अखेर केवळ 13 हजार 257 इतके सक्रीय रुग्ण आहेत. यापूर्वीच्या तुलनेत यंदा कोरोना चाचण्यांची संख्या वाढवूनही जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 25 वरून 18 टक्क्यांवर आला आहे. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 3 हजार 448 इतके रुग्ण दगावले. यातील 50 टक्के मृत्यू हे 60 ते 70 वयोगटातील होते. यातील सुमारे 70 टक्के मृत्यू हे व्याधिग्रस्त रुग्णांचे झाले आहेत. कोविड रुग्ण उशिराने रुग्णालयात दाखल होणे, घरीच उपचार करणे अशी कारणे मृत्यूच्या पाठीमागे आहेत. इतर राज्ये तसेच राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याचा लोकसंख्येच्या प्रमाणात येथील मृत्यूदर कमी होता. मात्र, कोल्हापूरबाबत काहीसे नकारात्मक चित्र उभे राहिल्याने प्रशासनाने आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांवर ते पाणी फिरवणारे होते.

जिल्ह्यात 27 ते 28 टक्के लसीकरण

कोल्हापूर जिल्ह्यात 40 लाख लोकसंख्येपैकी सुमारे 9 लाख 13 हजार 650 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस, तर 2 लाख 28 हजार 894 इतक्या लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच, जिल्ह्यातील 27 ते 28 टक्के नागरिकांनी कोविड लस घेतली आहे.

म्युकरमायकोसिसचा मुकाबला करण्यास सज्ज

कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून, म्युकरमायकोसिसचाही मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी ‘सीपीआर’सह इतर रुग्णालयांतही या आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या आजार व उपचाराबाबत जिल्ह्यातील नेत्ररोगतज्ञांनी नागरिकांमध्ये जनजागृती, प्रबोधन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

दोषी हॉस्पिटलवर कारवाई करणार

कोरोना संसर्गाची तिसरी लाट जिल्ह्यातील लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल, याविषयी सध्या अंदाज आहेत. या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासकीय आणि खासगी हॉस्पिटल्सनी सज्ज राहावे. याकामी हलगर्जीपण करणाऱया हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात बालरोगतज्ञांच्या दूरदृष्यप्रणालीद्वारे (व्ही.सी.) बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. यावेळी महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलंडे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पोळ उपस्थित होते.

ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड दुपटीने वाढवले

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जिल्ह्यात 2 हजार 396 ऑक्सिजन, 350 आयसीयू, तर 140 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होते. दुसऱया लाटेत प्रशासनाने 3 हजार 171 ऑक्सिजन, 648 आयसीयू, तर 300 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केले आहेत. तसेच, प्रत्येक तालुक्यातील 17 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 21 ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, सर्व कोविड सेंटरवर आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुना तपासणीची सोय केल्याने बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे
सोईचे गेले.

कोविड सेंटर दुपटीने वाढले

सध्या जिल्ह्यात 83 कोविड काळजी केंद्रे, 93 समर्पित, तर 12 कोविड समर्पित दवाखाने उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांवर त्वरित उपचार होत आहेत. पहिल्या लाटेत सर्वसाधारणपणे 28 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन लागत होता, तर प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त करून जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी सुमारे 52 टन म्हणजे जवळपास दुपटीने ऑक्सिजन उपलब्ध केला. तसेच, जिल्ह्यात वेगवेगळ्या 14 ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट उभारण्याची तयारी तातडीने सुरू केली आह