सीएम रिलीफ फंडसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 2 कोटी तर अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून 22 लाख 75 हजारांचा निधी

741

‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने 2 कोटी तर बँकेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाच्यावतीने जमा केलेला 22 लाख 76 हजार रुपयांचा निधी देण्यात आला. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ग्रामविकास मंत्री तथा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंत्रालयात सुपूर्द करण्यात आला.

संपुर्ण जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट देशासह महाराष्ट्रावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने 2 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला तर बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून 22 लाख 75 हजारांचा धनादेश कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार ‘कोरोना’शी लढण्यासाठी जमा केला आहे. या एक दिवसाच्या पगारातून जमलेली 22 लाख 75 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेशही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

आपली प्रतिक्रिया द्या