कोल्हापुरात आणखी 17 नवे कोरोना रुग्ण, आतापर्यंत एकूण 607 पॉझिटिव्ह

493

सोमवारी सकाळी 10 वाजता 98 प्राप्त अहवालापैकी 17 पॉझीटिव्ह तर 80 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण आजअखेर कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 607 झाली आहे. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 137 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने, सध्या एकुण 464 पॉझीटिव्ह रुग्णांवर सीपीआर मध्ये कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 161 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये शाहुवाडी-6, चंदगड-4, आजरा-3 तर हातकणंगले, भुदरगड,कागल आणि राधानगरी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी- पाटील यांनी दुपारी दिली. दरम्यान आतापर्यंत शाहूवाडी-161, गडहिंग्लज- 67, भुदरगड आणि राधानगरी प्रत्येकी-63, चंदगड-61, कागल-51, आजरा-48, पन्हाळा-24, करवीर-12, शिरोळ-7, गगनबावडा व हातकणंगले प्रत्येकी-6 तर नगरपरिषद क्षेत्रात-11, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात-20 असे एकूण 600 तसेच पुणे- 1, सोलापूर- 3, कर्नाटक -2 आणि आंध्रप्रदेश-1 अशा इतर जिल्हा व राज्यातील 7 मिळून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधीतांची संख्या 607 झाली आहे.

शनिवारी जिल्ह्यात सहावा बळी, प्रशासनाकडून माहिती उशिरा
कडवेपैकी लाळेवाडी, ता.शाहूवाडी येथील 55 वर्षीय महिलेचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बळींची संख्या सहा झाली. लाळेवाडी येथील ही महिला मुंबईहून आली होती. तिच्या पतीने घरी स्वतंत्र व्यवस्था असेल्याचे सांगितल्याने तिला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तर दि.25 रोजी तिचा स्वॅब घेण्यात आला होता. तिला जुलाबाचा त्रास वाढल्याने 27 मे रोजी सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या