… म्हणून शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला व राबवला ! – शरद पवार

506

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवारी कोल्हापूरमध्ये संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थित हा सोहळा झाला. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘गेल्या 50 वर्षांत कोल्हापूर असो व अन्य कुठेही, शाहू महाराजांसंबंधी कुठलाही सोहळा असला तरी माझी उपस्थिती चुकलेली नाही. महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांनी मिळून आम्ही लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती यांच्याकडे संसदेच्या प्रांगणात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याकरिता पुढाकार घेतला. आज संसदेमध्ये जाताना शाहू महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊनच जाता येतं.”

ते पुढे म्हणाले की, आरक्षणासंबंधी आजही आपल्यासमोर आव्हानं असताना त्याकाळी शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आणि राबवला. कारण अख्खी पिढी शिक्षित झाली पाहिजे असा विचार त्यामागे होता. समाजाला दिशा देणारे त्यांचे नेतृत्व होते.

sharad-pawar

आपल्या हातात असलेलं राज्य हे रयतेसाठी कसं वापरायचे, आणि ही सत्ता आपली नव्हे तर समाजातील शोषित, पीडित, उपेक्षित घटकांना उभे करण्यासाठी कशी वापरायची, हे सूत्र घेऊन रयतेसाठी राज्य करणारा या देशाचा राजा कोणता असा प्रश्न विचारला तर एकच उत्तर येतं ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज, असेही पवार यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या