कोल्हापूरात दोन रुग्णालये व एका विद्यापीठात अडीच हजार खाटांची सोय

365

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाच तर जिल्हा प्रशासनाने पुढील तयारी म्हणुन उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) पाठोपाठ डॉ.डि.वाय.पाटील या खाजगी रुग्णालयासह शिवाजी विद्यापीठात ही व्यवस्था करण्यात येणार आहे. सीपीआर मध्ये 650, डॉ.डि.वाय.पाटील रुग्णालयाचे 800 आणि शिवाजी विद्यापीठाचे १ हजार असे एकूण २ हजार ६५० खाट यामुळे उपलब्ध होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून 650 खाटांची क्षमता असलेल्या सीपीआर मध्ये पुर्णतः कोरोना बाधीतांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. येथील इतर आजाराने उपचारास दाखल असलेल्या रुग्णांना इतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सीपीआर ची तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे.यामध्ये करोना संबंधित नव्याने दाखल होणारे,संशयित आणि उपचार सुरू असलेले रुग्ण असे स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत.सद्या जिल्ह्यात तिघांचे अहवाल पाॅझीटिव्ह आले आहेत.तरीसुद्धा जर करोनाचा प्रादुर्भाव वाढलाच तरी जिल्हा प्रशासनाकडून त्या पुढील व्यवस्था केली आहे.सीपीआर नंतर 800 खाटांची क्षमता असलेले डॉ.डि.वाय.पाटील हे खाजगी रुग्णालय सुद्धा तयार ठेवण्यात आले आहे.यासंदर्भात डि.वाय.पाटील रुग्णालयाचे प्रमुख डॉ.संजय पाटील यांनी मान्यता दिल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

तसेच आपत्कालीन उपाययोजना म्हणून शिवाजी विद्यापीठातील सुमारे एक हजार खाटांच्या क्षमतेचे वसतिगृह सुद्धा सज्ज ठेवण्यात येत आहे.याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश दिल्याने,संशयित कोरोनाबाधित रुग्णांसाठी 1000 बेड क्षमतेचे (आयसीयू/आयसोलेशन) रुग्णालय प्रस्थापित करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ परिसरातील सर्व मुला-मुलींची वसतिगृहे वापरण्याचे नियोजित केले आहे.त्यानुसार प्रथम 500 खाटांचे रुग्णालय स्थापित करण्यास प्राधान्य देत, तंत्रज्ञान अधिविभागा कडील मुला-मुलींची वसतिगृहे अधिग्रहित करण्यात येत आहेत.

दिवसभरात 59 नमुने तपासणीसाठी पाठवले,तर 26 नमुने निगेटिव्ह

दरम्यान जिल्ह्यात केवळ तीनच रुग्णांचे अहवाल अजुन पाॅझिटिव्ह असुन, दिवसभरात 59 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.तर 26 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परदेशातुन जिल्ह्यात आलेल्या 820 पैकी आता केवळ 10 जणच होम कोरोंटाईन असुन उर्वरित सर्वांची 14 दिवसांचे वैद्यकीय निरिक्षण पुर्ण झाले आहे.तर मुंबई,पुणे आदी शहरांतुन आतापर्यंत जिल्ह्यात आल्याचे निष्पन्न झालेल्या 77 हजार 492 पैकी 67 हजार 124 जणांचे 14 दिवसांचे वैद्यकीय निरिक्षण पुर्ण झाले आहेत.आता केवळ 10 हजार 368 जण घरी देखरेखीखाली आहेत.आतापर्यंय 419 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन,त्यापैकी तब्बल 302 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर 76 रिपोर्ट अप्राप्त असुन,38 नमुने फेटाळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या