पश्चिम बंगालमध्ये 24 तासात दोन भाजप नेत्यांची हत्या

603

सामना ऑनलाईन। कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासात दोन भाजप नेत्यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. दालू शेख आणि अब्दुल कादीर मुल्ला अशी या नेत्यांची नावे आहेत. या हत्यांमागे तृणमूल काँग्रेसचाच हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर तृणमूलने हा आरोप फेटाळून लावला आहे.

यातील पहीली घटना बीरभूममधील लाभपूर येथे घडली आहे. दालु शेख असे या नेत्याचे नाव असून त्याच्या घराजवळच बॉम्ब फेकून त्याची हत्या करण्यात आली आहे. शेख नुकतेच सीपीआयमधून भाजपमध्ये आले होते. ते एक उमदे नेते होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रसार व प्रचार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.त्यामुळे ते तृणमूलच्या निशाण्यावर होते.

तर दुसरी घटना दक्षिण परगणातील ढोलाघाट येथील आहे. येथून भाजपचे नेते अब्दुल कादीर मुल्ला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह कालनागिनी नदीत वाहत असताना आढळला.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. भाजप तृणमूल यांच्यात जुंपली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांच्या हत्येचे सूत्रही सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या