धक्कादायक! कोलकाता बलात्काराविषयी पोस्ट शेअर केली म्हणून अभिनेत्रीला मिळाली बलात्काराची धमकी

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाबाबत डॉक्टरांचे आंदोलन सुरूच आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे. अनेक राजकारणी आणि कलाकारांनी या घटनेवर रोष व्यक्त केला. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या माजी सदस्या आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनी 20 ऑगस्ट रोजी कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणासंदर्भात निषेध पोस्ट शेअर केली होती. मात्र आता मिमी चक्रवर्ती यांनाच बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. याबाबत स्वत: मिमी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.

मिमी चक्रवर्ती यांनी सोशल मीडिया अकाऊंट X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘…आणि आम्ही महिलांसाठी न्याय मागतोय ना? हे नराधम त्यापैकींच काही आहेत. जिथे महिलांच्या पाठीशी उभे आहोत असे म्हणत गर्दीत मुखवटा घेऊन फिरणाऱ्या पुरुषांकडूनच बलात्काराच्या धमक्या येतात. आता त्या सामान्य झाल्या आहेत. याला कोणते संगोपन आणि शिक्षण परवानगी देते??? असा संताप मिमीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे व्यक्त केला. यासोबतच तिने कोलकाता पोलिसांच्या सायबर सेल विभागालाही टॅग केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mimi chakraborty (@mimichakraborty)

कोण आहे मिमी चक्रवर्ती ?
मिमी चक्रवर्ती 2019 ते 2024 पर्यंत जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होत्या. कोलकाता येथे एका डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ या अभिनेत्रीने वैयक्तिकरित्या सहभाग घेतला होता. मिमी व्यतिरिक्त, रिद्धी सेन, अरिंदम सिल आणि मधुमिता सरकार या अभिनेत्रींनी 14 ऑगस्टच्या रात्री आयोजित केलेल्या आंदोलनात भाग घेतला होता.