पश्चिम बंगाल मध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खुन करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्या गुप्तांगातून, डोळ्याांतून आणि नाकातून रक्त येत होतं. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात आरजी. कर मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या मजल्यावरच्या सेमिनार हॉलमध्ये एक डॉक्टर तरुणी जखमी अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिची प्रकृती इतकी नाजूक होती की उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
जेव्हा पिडीत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. तिच्या नाकातून, डोळ्यांतून आणि गुप्तांगातून रक्त वाहत होतं. तिच्या पोटावर जखमा होत्या. पिडीत तरुणीवर शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा तिचे मानेचे हाड मोडल्याचे समोर आले. आरोपीने तरुणीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खुन केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
तरुणीच्या मृत्यूनंतर संपूर्ण कोलकाता हादरले आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॅण्डल मार्च काढून न्याय मागितला आहे. तसेच या घटनेविरोधात विद्यार्थ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे. कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसते असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या आंदोलनावेळी फक्त एमर्जन्सी वॉर्ड सुरू होता.