कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारावर संपूर्ण देशात संताप उसळला आहे. या घटनेच्या निषेधार्ध मेडिकलचे विद्यार्थी आणि डॉक्टरांनी आंदोलने केली. यासोबतच आता बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला आहे.
बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट्टने कोलकाता येथील रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि नंतर निर्घृण हत्येवर प्रतिक्रिया दिली आहे. आलियाने सोशल मीडियावर पोस्ट द्वारे महिलांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. याचबरोबर तिने महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘आणखी एक बलात्कार. स्त्रिया कुठेही सुरक्षित नाहीत याची जाणीव असलेला आणखी एक दिवस. आणखी एक भयंकर बलात्कार आपल्याला आठवण करून देतो की निर्भया दुर्घटनेला एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे, पण अजूनही फारसा बदल झालेला नाही.असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
दरम्यान आलियाने रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचे आकडे देखील शेअर केले. हिंदुस्थानातीस 30% डॉक्टर्स आणि 80% नर्सिंग कर्मचारी महिला आहेत. मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हिंसाचारामुळे स्त्रिया अधिक असुरक्षित आहेत. 2022 पासून, महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 4% वाढ झाली आहे, त्यापैकी 20% पेक्षा जास्त बलात्कार आणि हल्ल्याचा समावेश आहे. 2022 मध्ये हिंदुस्थानात दिवसाला जवळपास 90 बलात्कारांची नोंद झाली. ही माहिती आलियाने आपल्या पोस्टद्वारे दिली.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेता आयुष्मान खुरानाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी पण कडी न लावता झोपली असते, जर मी पण मुलगा असते. मी पण खोडकर असते, मित्रांसोबत रात्रभर हिंडले असते, जर मी पण मुलगा असते. सगळे म्हणतात मुलींना शिकवा, तिला सशक्त बनवा. मात्र शिकून डॉक्टर झाल्यावर तिची ही अवस्था होते. तेव्हा आई-वडील त्यांची मुलगी गमावतात. जर मी पण मुलगा असते. तर हे सगळ झालंच नसतं. 36 तास तिच्यावर बलात्कार झाला, पुरुषाची वासना पूर्ण झाली. पण जर या पुरुषांमध्ये थो़डी मानवता, स्त्रीचा आदर असता तर…. अशी भावनिक पोस्ट आयुष्मानने केली आहे.