कोलकातामध्ये एका व्यक्तीने डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केला होता. त्याच्याबद्दल आता धक्कादायक खुलासे होत आहे. आरोपी संजय रॉयची चार लग्न झाली होती. त्यापैकी तीन पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. दुसरीकडे रॉयच्या आईने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
आरोपी संजय रॉयच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय नेहमी दारू पिऊन घरी यायचा. त्याने चार लग्न केली होती. त्यापैकी तीन बायका त्याला सोडून गेल्या. चौथ्या पत्नीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. संजय दार पिऊन पत्नीला मारझोड करायचा म्हणून त्याच्या तीनही बायका सोडून गेल्या असे शेजाऱ्यांनी सांगितले.
संजय रॉयच्या सासूने या माहितीला दुजोरा दिला आहे. संजय खूप आधीपासू दारू प्यायचा आणि महिलांसोबत त्याचे वर्तन चांगले नव्हते. संजयची आधी तीन लग्न झाली आहेत हे त्याने आपल्यापासून लपवले असेही संजयच्या सासूने सांगितले. माझ्या मुलीला त्रास दिल्याबद्दल आणि मारहाण केल्याबद्दल आम्ही पोलिसांत तक्रारही केली होती असेही संजयच्या सासूने सांगितले.
संजय हा पोलिसांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचा. त्यामुळे तो अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होता. संजयने अनेकांना पोलिसांत नोकरी लावतो म्हणून पैसे घेतले होते.
दुसरीकडे संजय रॉयच्या आईने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संजयने पोलिसांच्या दबावाखाली आरोप मान्य केल्याचे संजयच्या आईने म्हटले आहे.