कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली या प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना पिडीतेचे सोशल मीडियावरील सर्व फोटो हटविण्याचा आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याच्या सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बलात्कार पिडीतेची ओळख जाहीर केली जाऊ शकत नाही. मात्र तरीही पिडीतेचे फोटो सोशल मीडियावर आहेत. त्यानंतर सीजेआय डीव्हाय चंद्रचूड यांनी फोटो हटविण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणाबाबत स्वत: दखल घेत या प्रकरणाची सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने अनेक प्रश्नांवर लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेचा तपास करणाऱ्या सीबीआयला 22 ऑगस्टपर्यंत स्टेटस रिपोर्ट मागवला आहे, यासोबतच रुग्णालयातीस डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश यावेळी दिले.