
सामना ऑनलाईन। कोलकाता
पश्चिम बंगालमधील उत्तर परगना येथील मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 4 भाविकांचा मृत्यू झाला असून 27 हून अधिकजण जखमी झाले आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी संततधार पावसामुळे कमकुवत झालेली मंदिराची एक भिंत कोसळली. यावेळी हा अनर्थ घडला.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमी झालेल्यांना 1 लाख रुपये व किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे.
उत्तर परगना जिल्ह्यतील कछुआ येथे गुरुवारी रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच या ठिकाणी अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून भिंतीनाही ओल आली आहे. त्यातच मंदिरांची भिंत मातीची असल्याने ती पावसामुळे आधीच कमकुवत झाली होती. ती कोसळली. अचानक घ़डलेल्या या घटनेमुळे भाविक हादरले व सैरावैरा धावू लागले. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले. त्यातील चौघांचा नंतर मृत्यू झाला.
West Bengal: 4 dead & 27 injured after a wall of a temple, where people were gathering to celebrate #Janmastami, collapsed in Kachua, North 24 Pargana, earlier today. pic.twitter.com/L31UrWoEa2
— ANI (@ANI) August 23, 2019



























































