केबीसी पुन्हा येतोय! आजपासून नोंदणीला सुरुवात, चार टप्प्यांत स्पर्धकांची निवड

छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय क्वीज शो ‘कौन बनेगा करोडपती’चा 13वा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोसाठी स्पर्धकांची निवड ऑनलाईन पद्धतीने चार टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. त्यासाठी उद्या 10 मेपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. महानायक अमिताभ बच्चन हेच सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत. ‘‘कधी तुम्ही विचार केलाय तुमचे आणि तुमच्या स्कप्नांमधील अंतर किती आहे… फक्त तीन अक्षरांचे… कोशीश.’’ असे म्हणत या सिजनची घोषणा करण्यात आली आहे. केबीसीचा बारावा सिजन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसंबंधी नियमांचे पालन करून पार पडला होता. यंदाचा सिजनदेखील याच पद्धतीने पार पडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या