
शाळेत जाऊन 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला कोंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना कोंढव्यातील भाग्योदयनगरमधील शाळेत घडली. याप्रकरणी सईम कलिम शेख (वय 21, भाग्योदयनगर, नवाजिश पार्क, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमियोचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी भाग्योदयनगरमधील शाळेत आहे. सईम वारंवार अल्पवयीन मुलीला ‘चल तुझे घुमाके लाता हु’ असे म्हणत तिची छेड काढत होता. सहा फेब्रुवारीला त्याने मुलीच्या शाळेत जाऊन तिची छेड काढली होती.
तुझ्यामुळे मला मार खावा लागला असे म्हणत त्याने अल्पवयीन मुलीचा हात धरून ओढले. त्यानंतर मुलीने हा सर्व प्रकार घरी सांगितला. तिच्या भावांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी सईमला अटक केली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.


























































