कोकणात फोरजी सेवा सुरु करा, खासदार विनायक राऊत यांची मागणी

780

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात भारत संचार निगमने फोरजी सेवा सुरु करावी. तसेच मोबाईल टॉवरची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी भारत संचार निगम महाराष्ट्र टेलिकॉम विभागाचे मुख्य व्यवस्थापक मनोज मिश्रा यांच्याकडे केली.

वीज जोडणी अभावी बंद पडलेले टॉवर पुन्हा त्वरित सुरू करावेत तसेच भविष्यात वीज जोडणी तोडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. मंजूर केलेले 104 टॉवर पैकी पायापर्यंत पर्यंत काम झालेल्या टॉवरची उभारणी तातडीने करावी. टू जा,त्री जी बरोबर फोर चीची सुविधा सुद्धा लवकरात लवकर सुरू करावी.कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पुनःश्च सेवेत रुजू करून घ्यावे.या सर्व विषयांच्या चर्चे अंती फेब्रुवारी 2020 पर्यत सर्व कार्यवाही पूर्ण करू असे आश्वासन भारत संचार निगम महाराष्ट्र टेलिकॉम विभागाचे मुख्य व्यवस्थापक मनोज मिश्रा यांनी खासदार – शिवसेना सचिव, लोकसभा शिवसेना गटनेते विनायक राऊत यांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या