फुगड्यांच्या माध्यमातून ‘लेक वाचवा’ संदेश

426

सामना प्रतिनिधी। मालवण

श्रावण महिन्यात मराठी मन तसेच संस्कृतीचे दर्शन घडते. आपल्या रुढी परंपरा वेगवेगळे सणांमधुन दिसुन येतात. आणि याच रुढी परंपरा जोपासण्याचा प्रयत्न श्रावणधारा या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री शांतादुर्गा हायस्कुल वडाचापाट या प्रशालेच्या वतीने करण्यात आला.

श्रावणधारा या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थीनींसाठी गीतगायन, फुगडी तर विद्यार्थ्यांना हरिनाम सप्ताह या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होता. विद्यार्थिनींनी फुगड्यांच्या माध्यमातून ‘लेक वाचवा’ ‘स्त्री भ्रुण हत्या थांबवा’ या विषयांद्वारे समाजप्रबोधनात्मक संदेश पोचवण्याचा प्रयत्न केला. तसेच गीतगायन स्पर्धांमधुन श्रावण महिन्याचा थाट, त्याचे पावित्र्य, अशाप्रकारे श्रावण महिन्याचे वर्णन करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या स्वरचित कवितांचे वाचन यावेळी करण्यात आले. या संपुर्ण कार्यक्रमाचे परीक्षण प्रशालेतील शिक्षक पी. एच. कुबल, आणि सौ पी. पी. सनये यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक जे. एन. पाटील तर विद्यार्थ्यांना सौ डी. एस. राऊळ, पी. जी. केळुसकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पालव हिने तर आभार दिशा परब हिने मानले

आपली प्रतिक्रिया द्या