रत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका

कोकणातही मुसळधार पावसाने थैमान घातले असून दोन्ही जिल्ह्यातील भात शेतीला याचा मोछा फटका बसला आहे. भरात आलेले पीक असे पावसामुळे वाहून जाताना पाहून शेतकरीही हवालदिल झाला.

भुईबावडा घाट खचतोय

सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरहून जोडण्यात महत्वपूर्ण भुईबावडा व करुळ या घाटांचा समावेश आहे. मात्र, पावसाळ्यात हे दोन्ही घाट धोकादायक स्थितीत असतात. भुईबावडा घाटात रिंगेवाडी पासून सुमारे चार ते पाच कि. मी. अंतरावर रस्त्याच्या साईडपट्टयांसहीत मध्यभागी रस्ता खचत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच उपाययोजना करावी. अन्यथा दुर्घटना घडण्याची दाट संभवना वर्तविली जात आहे. तीन महिन्यापूर्वी भुईबावडा घाटात रिंगेवाडी पासून चार-पाच कि. मी. अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठया भेगा पडल्या होत्या. त्याठिकाणी बांधकाम विभागाने मलमपट्टी केली आहे. मात्र त्याचठिकाणी रस्ता खचल्याने साईडपट्टया तुटत चालल्या आहेत.

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 131 मि. मी. पाऊस
तालुक्यासह जिल्ह्याला धुवाधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दिवसभर धो-धो पाऊस कोसळत असल्याने काही भागात भात शेती आडवी झाल्याने शेतक्रयांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 131.00 मी. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मात्र सद्याqस्थतीत भुईबावडा व करुळ घाट मार्ग सुरक्षित आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच आहे. तालुक्यात सलग तीन दिवसापासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने काही ठिकाणी भातशेतीत पाणी शिरल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. संततधार कोसळणा-या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. तर भुईबावडा व करुळ हे घाटमार्ग सद्धाqस्थतीत सुरक्षित आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेल्या 24 तासात वैभववाडी तालुक्यात 131.00 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरीत पावसाचा जोर सुरूच
सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर रत्नागिरीत कायम राहिला आहे. अतिवृष्टीमुळे जिह्यात अनेक ठिकाणी भातशेतीचे नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासांत जिह्यात एवूâण 184.90 मिमी म्हणजेच सरासरी 20.54 मिमी इतका पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे जिह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पावसामुळे पिकलेली भातशेती आडवी झाली आहे. पुराचे पाणी भातशेतीत शिरल्याने नुकसान झाले आहे. िंपपळवाडी, मुचवुंâदी, अर्जुना, गडनदी, नातूवाडी ही धरणे तुडूंब भरली आहेत.

गेल्या 24 तासांत जिह्यात तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 14.80 मिमी, दापोली 6.10 मिमी, खेड 12.60 मिमी, गुहागर 12 मिमी, चिपळूण 15.60 मिमी, संगमेश्वर 30.80 मिमी, रत्नागिरी 32 मिमी, लांजा 34.60 मिमी आणि राजापूर 26.40 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

आतापर्यंत 2596 मिमी पाऊस
यंदा रत्नागिरी जिह्यात समाधानकारक पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी अडीच हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये आजपर्यंतचे एवूâण पर्जन्यमान मंडणगड 2259.87 मिमी, दापोली 1830.41 मिमी, खेड 2554.68 मिमी, गुहागर 2723.05 मिमी, चिपळूण 2404.01 मिमी, संगमेश्वर 3203.42 मिमी, रत्नागिरी 3040.33 मिमी, लांजा 2721.52 मिमी आणि राजापूर 2633.88 मिमी इतके झाले. एवूâण पर्जन्यमान 23371.17 मिमी आणि सरासरी 2596.80 मिमी इतका पाऊस पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या