सलग सुट्ट्यांमध्येही जादा गाड्या नाहीत, कोकण रेल्वेमध्ये खचाखच गर्दी

सलग सुट्टय़ांमुळे कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांना रविवारीही प्रचंड गर्दी झाली. संभाव्य गर्दी लक्षात घेत मध्य आणि कोकण रेल्वेने वेळेत पुरेशा जादा गाड्या सोडल्या नाहीत. त्यामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नव्हती.

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचची परिस्थितीदेखील अत्यंत भयावह होती. अभूतपूर्व गर्दीत प्रवाशांची घुसमट झाली. ज्येष्ठ नागरिक, महिलांचे प्रचंड हाल झाले. सलग सुट्टय़ांच्या कालावधीत कोकण रेल्वेच्या गाडय़ांना गर्दी होणे स्वाभाविकच असूनही रेल्वे प्रशासन पुरेशा जादा गाडय़ांचे नियोजन करू शकले नाही, अशी नाराजी कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी व्यक्त केली.