
गेला महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले आहे.वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजासह नागरिक आनंदीत झाले आहेत.
यंदा पावसाचे उशीरा आगमन झाले.त्यानंतर जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडला होता.मात्र ऑगस्ट महिना कोरडा गेला.पावसाने दडी मारल्याने कडक उन्हात भातशेती करपू लागली होती.पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत होता.तसेच धरणातही मुबलक पाणीसाठा नसल्याने भविष्यातील पाणीटंचाईने नागरिक त्रस्त होते.अखेर सप्टेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावली.आज सकाळपासून ढगाळ वातावरणात मुसळधार पाऊस पडत आहे.



























































