कोकणातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सावंतवाडीत

कोकणातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सावंतवाडीमधील सालईवाडा येथे आहे. 1906 मध्ये विष्णू सापळे व सीताराम बांदेकर यांनी स्थापन केलेल्या या मंडळाने आपली 116 वर्षांची अखंड परंपरा यंदाही कायम राखली आहे.

कोकणातील हा पहिला गणेशोत्सव असल्यामुळे सावंतवाडी शहराचे हे भूषणच आहे. सालईवाडा येथील केशव सापळे, राजाराम बांदेकर, राजाराम सापळे, गोविंद विरनोडकर, गोविंद मिशाळ, गोपाळ कद्रेकर, बाळकृष्ण पेडणेकर, शांताराम गोवेकर, आबा तळवणेकर, यशवंत सापळे यांनी या मंडळांची स्थापना केली. आजही या मंडळाच्या माध्यमातून गणरायाची श्रद्धापूर्वक 21 दिवस मनोभावे सेवा केली जाते.

श्रींच्या मूर्तीची वैभवशाली विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांतील लोक मोठय़ा संख्येने उपस्थितीत राहतात. गणपतीची आकर्षक मूर्ती तयार करणे व गणपतीपुढील सजावट करण्याची जबाबदारी आबा पेडणेकर यांनी सांभाळली होती. दर आठवडय़ाला सजावटीमध्ये बदल केला जात होता. यामुळे शहरामध्ये या गणेशोत्सवाचे आकर्षण मोठे होते. या काळात साफसफाई, दिवाबत्ती या महत्त्वाच्या बाबी मंगेश बांदेकर कुटुंबीयांनी सांभाळली होती.

आपली प्रतिक्रिया द्या